वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांचा विशेष प्रशस्ती पत्रक देवुन गौरव
----------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) पुणे ग्रामीण पोलीस दलातील पौड/ मुळशी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार माधवराव यादव यांनी त्यांच्या पोलीस स्टेशन मधील अनेक मोठ्या प्रमाणात घडलेल्या गुन्हानचा तपास अतिशय उत्कृष्ट रीतीने करून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या . त्यानी पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व पोलीस स्टेशन पेक्षा अतिशय चांगली कामगिरी केली, त्याबद्दल पुणे ग्रामीण पोलीस चे आधिक्षक मा.अंकित गोयल सर (भा.पो.से.) यांचे हस्ते मनोजकुमार यादव यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांना हा पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.