पंढरपूरचे लोकप्रिय शिक्षक शांताराम गाजरे यांच्या" जाणता राजा कवितेस उत्कृष्ट मानांकन ,पुरस्कार जाहीर..

पंढरपूरचे लोकप्रिय शिक्षक शांताराम गाजरे यांच्या" जाणता राजा कवितेस उत्कृष्ट मानांकन ,पुरस्कार जाहीर..

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर( दै .पंढरी नगरी न्युज) : सोलापूर येथील भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी संस्थेच्या  संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कविता स्पर्धेत शांताराम गाजरे यांच्या "जाणता राजा, या लोकप्रिय कवितेस जिल्ह्याचा "उत्कृष्ट मानांकन ,पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल शिरसाट यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा येथे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कविता स्पर्धेत राज्यातून अनेक दिग्गज संगीत कला नाट्यप्रेमी या स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता .त्यामध्ये पंढरपूर येथील नामांकित शिस्त व लोकप्रिय शिक्षक शांताराम गाजरे  यांच्या जाणता राजा या कवितेस प्रथम "उत्कृष्ट मानांकन, पुरस्कार जाहीर करण्यात आला . यावेळी हा पुरस्कार येत्या काही दिवसात  त्यांना कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन  गौरवण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल शिरसट यांनी सांगितले, यावेळी पुरस्कार वितरण गौरव सत्कार सोहळा समितीचे सोलापूर उपाध्यक्ष विजय जायभाये ,कार्याध्यक्ष शिल्पा मुसळे ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय सांगोलकर ,जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पालखे इ.उपस्थित होते.

शांताराम गाजरे यांना या अगोदर विविध सामाजिक संस्थेकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर एकदा ९ महिन्यात २६ पुरस्कार देण्यात आले होते . त्यावेळी शिक्षक शांताराम गाजरे यांचे सर्वांनी कौतुक केले होते. त्यानंतर आता या जाणता राजा या कवितेची दखल घेऊन सोलापूर येथील भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच  या संस्थेने त्यांना उत्कृष्ट मानांकन पुरस्कार जाहीर केला आहे. शिक्षक शांताराम गाजरे यांना संगीत कला नाट्य धार्मिक अशा अनेक  गोष्टीची आवड आहे. सध्या शिक्षक शांताराम गाजरे हे शेळवे (ता. पंढरपूर )येथील सुपुत्र असून ते आपल्या कर्मभूमीतील जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते सध्या विविध सामाजिक संस्थेच्या नऊ पदावर कार्यरत असलेले शांताराम गाजरे सर हे सर्वच पदाला व्यवस्थित न्याय देत असल्याचे सांगण्यात येते,त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

त्यांना हा उत्कृष्ट मानांकन पुरस्कार मिळवल्याबद्दल वर्गमित्र असलेले मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत आप्पा माने यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे ,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब काळे गुरुजी ,पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे, सोलापूर प्राथमिक शिक्षक  सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे, शिक्षण विस्तार अधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख दत्तात्रय खाडे ,पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन पाटील गुरुजी, पंढरपूर प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी कार्याध्यक्ष सुनिल घुले गुरुजी, विनोद जाधव गुरुजी, शंकरराव सुरवसे सर,  अण्णासाहेब पवार सर, तसेच विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी व मित्र परिवार यांनी प्रत्यक्ष भेटून फोन द्वारे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.