मंगळवेढा एस .टी.आगार प्रमुख संजय भोसले यांचा "उत्कृष्ट सेवा ,केल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल कॉलेज बेगमपूर यांच्यावतीने स्वागत पर सत्कार...
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( दै. पंढरी नगरी )न्युज महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस.टी) मंगळवेढा आगाराचे नूतन व्यवस्थापक संजय भोसले यांचा उत्कृष्ट कामगिरी व सेवा केल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल कॉलेज बेगमपूरचे प्राचार्य कल्याण भोसले (सर )यांच्या हस्ते यांनी चार श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. मंगळवेढा परिवहन महामंडळ आगाराच्या तत्कालीन व्यवस्थापिका श्रीमती मधुरा जाधववर यांची बदली झाली होती. त्यामुळे मंगळवेढा येथील एस .टी आगार प्रमुखाचे व्यवस्थापक पद रिकामी होते. त्यांच्या जागी मलकापूर येथील कार्यमुक्त होऊन संजय भोसले हे मंगळवेढा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ या आगारात व्यवस्थापक म्हणून रुजू झाले असून त्यांनी आगार व्यवस्थापकाची जबाबदारी घेतल्यापासून एस .टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने शिस्त लावली आहे.
मंगळवेढा आगारातील ग्रामीण भागात ये - जा करणाऱ्या बसेस वेळेवर सोडणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विचारपूस करणे कर्मचाऱ्यांना आदर देणे ,शालेय विद्यार्थी व प्रवासी यांना वेळेवर जास्तीत जास्त बसेसची मदत करणे ,ग्रामीण भागात बंद असलेल्या ठिकाणी बस सेवा सुरू करणे हा त्यांच्या कामाचा हातखंडा अविरतपणे सुरू आहे. त्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल कॉलेज बेगमपूर यांच्यावतीने जंगी स्वागत पर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील सुपरवायझर कोरे सर, इंगवले सर, मलकारी माळी, नकाते सर, शेंडेकर मॅडम इ. शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.