सुनावणीला मंगळवेढा प्रांताधिकारी सातत्याने गैरहजर राहत असल्याने शेतकर्यांना दिली जातेय तारिख पे....... तारीख
_______________________________________________
ते आले अन ..आर्धातासातच निघून गेले...!
_______________________________________________
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) ; मंगळवेढा प्रांत कार्यालयातील लाच प्रकरणाच्या घटनेनंतर प्रांताधिकारी कार्यालयाकडे फिरकत नसल्याने कार्यालय अधिकार्यांविना निराधार बनले असल्याच्या भावना नागरिक व शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. दरम्यान,येथील प्रांताधिकारी तब्बल २६ दिवस उलटूनही कार्यालयाकडे फिरकले नसल्यामुळे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना सुनावणीच्या तारखा तारीख पे.... तारिख मिळत असल्याने शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे.ते बुधवारी आले ...अन ....आर्धातासातच निघून गेले.
सांगोला तालुक्यातील एका शेतकर्याचे राष्ट्रीय महामार्गातील पाईपलाईनचे रक्कम काढून देण्यासाठी येथील तलाठी व एक झिरो कर्मचारी यांच्यावर लाचेचा गुन्हा दिनांक २९ मार्च रात्री झाला दाखल होता. तेव्हापासून येथील प्रांताधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याच्या तक्रारी शेतकरी व नागरिकांच्या आहेत.परिणामी अधिकार्याविना हे कार्यालय पोरके झाले असल्याच्या भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. चालू महिन्यातील चार मंगळवार प्रांताधिकारी तारखेला गैर हजर असल्यामुळे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील आलेल्या शेतकर्यांना केवळ पुढील तारखा देवूनच माघारी पाठविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
दि.२५ एप्रिल मंगळवार रोजी स्थावर मालमत्ता ३४ केसेस, आर.टी.एस.आर. ४२ केसेस,हद्दपारी ३ केसेस, नागरिक पेन्शन व रस्ता १० केसेस अशा एकूण ८९ केसाची सुनावणी ठेवली होती. मात्र प्रांताधिकारी सुनावणीला गैरहजर राहिल्याने गेल्या चार मंगळवारी या सुनावणी होवू शकल्या नाहीत. २९ कि.मी. अंतरावरून सांगोल्यातील शेतकरी व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी नागरिक या तारखांना भर उन्हात हजर होते.मात्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कामकाजावर नाराजी व्यक्त करीत आल्या पावलांनी पुढील तारीख घेवून माघारी जावे लागल्याचे चित्र हाेते.
दरम्यान बुधवार २६ रोजी कार्यालयाकडे चौकशी केली असता अकरा वाजता प्रांत अधिकारी कार्यालयात आले व साडेअकरा वाजता फोंजा पोचवून निघून गेल्याचे सांगण्यात आले. लाच प्रकरण घडल्यापासून येथील अधिकार्याची काम करण्याची मानसिकता नसल्याची नागरिकांमधून चर्चा असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे नव्याने अधिकारी नेमून नागरिकांचे रेंगाळली कामे मार्गी लावावी अशी मागणी होत आहे. दरम्यान लाच प्रकरणाचे महाभारत ज्याच्यामुळे घडले ते अधिकारी लाचलुचपत अधिकार्याच्या आशीर्वादामुळे अद्यापही बाहेर फिरत आहेत.आरोपी नळे अदयापही तोंड उघडत नसल्याचे कारण पुढे करून हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे परिणामी तपास व्यवस्थित होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात असून लाचलुचपत पुणे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या कामी लक्ष घालून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ज्यांच्यामुळे महसूल विभाग बदनाम झाला त्या अधिकार्याची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गेल्या तिन वर्षात शेतकर्याचा महामार्गाचा माेबदला मिळवन्यासाठी शेतकर्यांची टक्कवारीच्या माध्यमातुन पिळून काढल्याचा प्रकार जगजाहीर आसताना ताे आधिकारी आद्यापही माेकाटच कसा काय आसा संताप जनक सवाल जेष्ठ शेतकरी व नागरीक वर्गातुन व्यक्त हाेत आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी देखील या घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाची चौकशी लावणे अपेक्षित असताना त्यांनी केवळ बदली करून जावा असा सोज्वळ सल्ला दिल्याने शेतकरी वर्ग संतापला आहे. दामाजीपंताने दुष्काळाच्या काळात ज्वारीचे कोठार खुले करून गोरगरिबांना जगवले होते परंतु या अधिकार्याने मात्र गोरगरिबांचे लुटून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग केला आहे. येथे नेमणुकीस असलेला तलाठी सुरज नळेला प्रांताधिकार्यांनी केवळ रस्त्याच्या टक्केवारीच्या वसुलीसाठी दिनांक १८नोव्हेंबर २०२१ रोजी तहसील कार्यालयाकडे बदलीचा आदेश काढून प्रांतकार्यालयाकडे घेतले हाेते. तसेच दिनांक २७ डिसेंबर २१ रोजी आरळी येथून कार्यमुक्त करून प्रांत कार्यालयात हजर करून घेतले. अरळी येथे तहसीलदार यांनी २७ जून२०१९ रोजी नेमणूक केली होती अरळी सजेतील तलाठ्याची जागा अद्यापही रिक्त असून या जागेवर अतिरिक्त म्हणून बी.बी. गायकवाड यांच्याकडे कार्यभार दिला आहे. दरम्यान येथील शेतकर्यांची गैरसोय निर्माण करून प्रांताधिकारी यांनी आपल्या सोयीसाठी बदलीचा आदेश केल्याने येथील प्रांताचा मनमानी कारभार उघड झाला आहे. पुणे विभागाचे महसुल आयुक्त यांनी या संपुर्ण घटनेची चाैकशी करून कारवाई करावी आशि मागणी हाेत आहे.
{सांगोला येथील गट नं.२७५मधील ५ ब/२ हा प्लॉट महामार्गात गेला आहे.याची मंजूर रक्कम ६ लाख रूपये मिळण्यासाठी मी प्रांताधिकार्यांकडे सातत्याने भेटूनही टक्केवारी रक्कम न दिल्याने मंजूर रक्कम अदयापपर्यत दिलेली नाही. माझे वय ६७ असल्याने प्रांताधिकारी कार्यालकडे चकरा मारून मी त्रस्त झालो आहे.
- दयानंद स्वामी,सेवानिवृत्त फौजदार,सांगोला}