करकंब येथील ओमकार कृषी केंद्रावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल!

करकंब येथील ओमकार कृषी केंद्रावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल!

-----------------------------------------------------------------------------------
करकंब व परिसरातील शेतकरी कृषी केंद्र चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली
----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ओंकार कृषी केंद्रावर जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने दुसऱ्यांदा गुन्हा दाखल केल्याने करकंब व परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे .राज्यात सगळीकडे बंदी असलेल्या मॉडर्न कंपनीच्या तणनाशक विक्री करून शासनाची आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी या कृषी केंद्रावर सोलापूर जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक धनंजय पाटील यांनी रीतसर फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी ,पंढरपूर तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांच्याकडे करकंब येथील व काही गावातील ८ते द१०शेतकऱ्याकडून कृषी केंद्राबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. करकंब येथील कृषी दुकानदार संजय राजाराम पवार यांच्या ओंकार कृषी केंद्रातून काही शेतकऱ्यांनी तन नाशक खरेदी करून आपले द्राक्षबाग शेतीमध्ये ऑक्टोबर छाटणी अगोदर १० ते १५ दिवस तन नाशक फवारणी केली होती .मात्र छाटणीनंतर द्राक्ष बाग फुटली नाही. सध्या त्याच्या बागेमधील पिकाला एकही काडी तयार झाली नाही .यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे तक्रारीमध्ये म्हटली होती .

यानुसार पंढरपूर तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी कार्यालयीन पथका समवेत जाऊन करकंबच्या ओंकार कृषी केंद्राची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यांमध्ये विक्रीचा परवाना नसलेले मॉडर्न अँग्रीजेनेटिक लिमिटेड कंपनीचे तन नाशक आढळून आले .सदर तन नाशकावर बंदी असताना त्याची परस्पर विक्री करून कीटकनाशके अधिनियम १९६८अन्वये मधील तरतुदीनुसार नियमाचा भंग केल्याने निदर्शनास आले .त्यानुसार दुकान मालक यांच्याकडे तणनाशक विक्रीचा परवाना आढळून आला नाही .

त्यामुळे दुकानाच्या तपासणीमध्ये सापडलेल्या तन नाशकाच्या बाटल्या जप्त करून ताब्यात घेतल्या त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले असून या प्रकरणाचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आला असता सदर कंपनीस पत्र व्यवहार करून तणनाशक विक्री बाबत सूचना केल्या असता राज्यात औषधी विक्रीचा परवाना बाबत विचारणा केली असता कंपनीला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे शेतकरी व शासनाची परस्पर फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता १८६०चे कलम ४२०/ ३४सह कीटकनाशके अधिनियम १९६८ची उल्लंघन केल्याची रीतसर फिर्याद देऊन करकंबच्या ओंकार कृषी केंद्रावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल केल्याची माहिती सोलापूर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली.