भगतसिंह कोषारी राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची व्यक्त केली इच्छा..!

भगतसिंह कोषारी राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची व्यक्त केली इच्छा..!

---------------------------------------------------------------------------------

मुंबई( दै.पंढरी नगरी न्युज ) : मागील आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.यामुळं राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून, भाजपा व राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं जात असून, राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राजीनाम्याबाबत राज्यपालांचे एक मोठ विधान समोर येत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले. त्यानंतर पुन्हा एकदा मागील आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपा व राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं जात असून, राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राजीनाम्याबाबत राज्यपालांचे एक मोठ विधान समोर येत आहे.

दरम्यान, महाराजांच्या वक्तव्यानंतर राज्यपालांच्या विरोधात  राज्यभर निषेध व आंदोलन केली जात असून, राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी स्वत:च्या राज्यात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तसेच राज्यातून सर्वांनी राज्यपालांचा निषेध केला आहे. यामुळं राज्यपालांना मोठ्या रोषाला सामोरी जावे लागले आहे. म्हणून राज्यपालांनी स्वत: आपण पदमुक्त होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळं लवकरच राज्यपाल राजीनामा देणार असून, नवीन राज्यपाल कोण येतंय, याची चर्चा सुरु आहे.