जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, शेळवे. आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित...!
---------------------------------------------------------------------------------
आदर्श मुख्याध्यापक शांताराम गाजरे यांच्यासह सर्व शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर दि.१२. पंढरपूर तालुक्यातील जि. प .प्रा शाळा, शेळवे ही 1952 साली स्थापन करण्यात आलेली शाळा दर्जेदार शिक्षण आणि सर्व उपक्रम राबविण्यात यशस्वी असलेल्या या शेळवे शाळा आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बाळासाहेब काळे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने जि .प. प्रा. शाळा, शेळवे या शाळेला महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा सल्लागार बाळासाहेब काळे सर यांच्या हस्ते आदर्श शाळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी वाघुले, उपसरपंच किरणदादा गाजरे,माजी सरपंच दत्तात्रय मस्के,केंद्रप्रमुख खाडे, मुख्याध्यापक शांताराम गाजरे सर, उपशिक्षिका शुभांगी माळी मॅडम, उपशिक्षक सुनिल नाईकनवरे सर, शिक्षक नेते शंकरराव सुरवसे सर, केशव राठोड सर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थापक रामभाऊ यादव सर,चेअरमन शिंदे सर,व्हाईस चेअरमन वाघमारे सर व संचालक मंडळ उपस्थित होते. सद्गुरू मंगल कार्यालय, वाखरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्याध्यापक शांताराम गाजरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेला हा बहुमान प्राप्त झाला आहे. कवी, शायर,आणि साहित्यिक क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व, सतत प्रसन्न आणि प्रेरणादायी, व्यापारी, शेतकरी आणि इतर अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे.
शांताराम गाजरे सर यांना यापूर्वी गुणवंत शिक्षक, आदर्श शिक्षक, आचार्य दोंदे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शेळवे शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा.श्री.लिगाडे , उपशिक्षणाधिकारी संजय जावीर , प्राथमिक शिक्षणाधिकारी मिरकले साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी शेळवे शाळेचे कौतुक करत मुख्याध्यापक शांताराम गाजरे सर व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.