बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये अँटी रॅगिंग सप्ताह उत्साहात साजरा
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै .पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये अँटी रॅगिंग सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. १२ ऑगस्ट अँटी रॅगिंग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट असा अँटी रॅगिंग सप्ताह संपूर्ण देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी या महाविद्यालयामध्ये सुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत अँटी रिंग म्हणजे काय? अँटी रॅगिंग विरोधात कोठे दाद मागता येते? या संदर्भात कायद्यातील तरतुदी काय आहेत? याबाबत सविस्तर उद्बोधन करण्यात आले. प्रत्येकाला आत्मसन्मान आहे,तो जपला गेला पाहिजे .आपल्या वागण्याने किंवा कृतीने इतरांच्या अधिकारावर गदा येऊ नये. एखाद्याला विनाकारण त्रास होऊ नये . विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपल्या महाविद्यालयात अँटी रॅगिंग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या काही अडचणी असल्यास या कक्षाचे समन्वयक प्राध्यापक पी.पी. नरळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. त्याचप्रमाणे आपण तक्रार पेटीमध्ये सुद्धा आपले मत किंवा आपली अडचण नोंदवू शकता. आपल्या महाविद्यालयात कोणत्याही व्यक्तीला त्रास होता कामा,यासाठी सर्व कर्मचारी सौजन्याने एकमेकांशी सुसंवाद साधतात. याचा आपणा सर्वांना अभिमान आहेच ! प्रत्येकाच्या हक्काची जाणीव आपणाला असायला हवी. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करने हे आपले आद्यकर्तव्य आहे. याची जाण आपण सर्वांनी ठेवली पाहिजे.
या सप्ताहाचा समारोप विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना वेबसाईट वरील माहितीपट व लघुपट ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहामध्ये दाखविण्यात आले. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग बाबत जागृती तसेच माहिती व दाद मागण्याची प्रक्रिया तसेच रॅगिंग चे प्रकार, रॅगिंग नेमकं कशाला म्हणायचं याबाबतही व्हिडिओद्वारे उद्बोधन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस .गोरे तसेच विभाग प्रमुख, प्राध्यापक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. समारोप प्रसंगी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ एस.एस.गोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सर्व प्रशिक्षणार्थींना महाविद्यालयातील वातावरण खेळीमेळीचे व सहकार्यमय ठेवण्याबाबत आवाहन केले. आपण शिक्षक म्हणून कार्य करणार आहात प्रत्येकाच्या हक्काची जाणीव आपल्याला असायला हवी.तसेच कोणाच्याही आत्मसन्मानाची पायमल्ली होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी ,असे आवाहन केले. या सप्ताहाची नियोजनाची जबाबदारी समन्वयक सहा. प्रा. पी. पी नरळे यांनी पार पाडली.