श्री बार्शी गोरक्षण मंडळ,बार्शी या संस्थेला श्री रामदेवपीर सेवा संस्था मंडळ, मुंबई (मालाड) या संस्थेची देणगी देऊन सदिच्छा भेट
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै.पंढरी नगरी न्यूज )- बार्शी येथील श्री बार्शी गोरक्षण मंडळ,बार्शी येथे दि. रविवार 13 .रोजी श्री रामदेवपीर सेवा संस्था,मुंबई (मालाड) या संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळाचे अध्यक्ष हसमुख सोळंकी सेक्रेटरी इरेश भटिडा,उपाध्यक्ष यशवंत सोळंकी, संचालक राजेश वाघेला, दिनेश सोळंकी, आनंद सोळंकी, अश्विन वाघेला, करशनभाई भोलेश्वरी, सुरेश सोळंकी यांनी बार्शी गोरक्षण मंडळ, बार्शी या संस्थेला सदिच्छा भेट देऊन येथील गाईला हिरव्या चा-यासाठी रोख रक्कम ११ हजार रुपये देणगी देण्यात आली.
यावेळी बार्शी गोरक्षण मंडळ, बार्शीचे अध्यक्ष बाळासाहेब आडके,सेक्रेटरी विजयकुमार बागमार,कोषाध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,संचालक संजय सोपल,व्यवस्थापक महारूद्र धारूरकर,रवि क्लासेसचे संस्थापक मधुकर डोईफोडे सर हे उपस्थित होते.प्रस्तावना व सुत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब आडके यांनी केले.व आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.