डॉ. अरुण जाधव यांची शिवाजी विद्यापीठाच्या ॲकॅडमीक कौन्सिलवर नियुक्ती बद्दल सिद्धेवाडी जंगी सत्कार..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी ग्रामपंचायतच्यावतीने डॉ .अरुण मुरलीधर जाधव यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अकॅडमीक कौन्सिल मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सारंग जाधव उपसरपंच लक्ष्मण गोडसे सदस्य यांच्या शुभहस्ते सत्कार पर सन्मान करण्यात आला .डॉ. अरुण जाधव हे सध्या इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत डॉ. अरुण जाधव हे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील रहिवासी असून त्यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ॲकॅडमीक कौन्सिलवर निवड झालेबद्दल सिद्धेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मेडसिंगी जुनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य व सिद्धेवाडी चे सुपुत्र डी .डी गोडसे सर, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे ,वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव ,पंढरपूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन पाटील गुरुजी ,सोलापूर जिल्हा परिषदेचे स्वच्छता अभियान प्रकल्प प्रमुख सचिन जाधव, पोलीस पाटील दत्तात्रय जाधव ,यशवंतराव चव्हाण सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रदीपक भालेकर गुरुजी ,प्रा. बी.डी गोडसे सर, ग्रामपंचायत सदस्य बालाजी जाधव, रमेश बनसोडे, रणजीत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ क्षीरसागर, लेंडवे सर तावशी, सोमलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी जाधव, जीवन- ज्योती किराणा दुकानाचे मालक दिलीप जाधव, सोमेश्वर पाटील, शरद जाधव, डी बी जाधव सर, गजेंद्र जाधव इ.प्रमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी डी गोडसे सर यांनी केले ,आभार डी.बी जाधव सर यांनी मानले.