शेतकऱ्यांनी शेतीची योग्य पद्धतीने नियोजन केल्यास पिकाच्या उत्पन्नात निश्चित आर्थिक वाढ होईल - तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे!

शेतकऱ्यांनी शेतीची योग्य पद्धतीने नियोजन केल्यास पिकाच्या उत्पन्नात निश्चित आर्थिक वाढ होईल - तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे!

--------------------------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास पिकाच्या उत्पन्नात निश्चित आर्थिक ,जादा वाढ होईल
--------------------------------------------------------------------------------------
पंढरी- नगरी न्यूज : शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वारंवार एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत खराब होत असून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीची खते सेंद्रिय खताचा वापर तसेच उसाचे पाचट कुजवणे अशा पद्धतीने शेतीचे योग्य नियोजन केल्यास पिकाच्या उत्पन्नात निश्चितच आर्थिक व जादा वाढीचा फायदा होत असल्याचे मत पंढरपूरचे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी व्यक्त केले.

पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे ग्रामस्थ व आदर्श शेतकरी व कृषी श्रमिक कृतज्ञता सन्मान सोहळा समितीच्या वतीने गावातील आदर्श शेतकरी व आदर्श कृषी श्रमिक यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून तालुका कृषी अधिकारी सरडे बोलत होते.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. जे जी जाधव उपस्थित होते.

यावेळी मच्छिंद्र जाधव, छगन जाधव, दिलीप जाधव ,आप्पा गोडसे यांना आदर्श शेतकरी, तर कंकुबाई मोलाने ,बाळासाहेब फडतरे यांना आदर्श कृषी श्रमिक पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व कुटुंबासह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी पुढे म्हणाले की ,शेतीमध्ये व्यवसाय दृष्टिकोन ठेवून अतिरिक्त खर्च कमी करून नफ्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे .शेती साक्षरता ही शेती व्यवसायासाठी महत्त्वाची बाब आहे .यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका योग्य पाणी व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन पिकाची निवड यावर ज्ञान आत्मसात करून शेती करणे सध्या आवश्यक असल्याचे सांगून शेतीसोबत प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्याशिवाय शेती उत्पादनाच्या दराचा प्रश्न मार्गी लागणार नाही .यासाठी ३५% टक्के अनुदान देणारी योजना अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबाचा दैनंदिन खर्च मागील या प्रमाणात जर जोडधंदा म्हणून पशुपालनाचा समावेश केल्यास खतावरील खर्चही कमी होईल व आर्थिक स्थिरता येण्यास मदत होईल शेतकऱ्यांनी यांनी कृषी विभाग विविध प्रसार माध्यमे यांच्याशी संपर्क ठेवून ज्ञान वाढवले पाहिजे व्यवसायातील नफा हा आपल्या व्यवसायातील अनुभव व ज्ञान यावर अवलंबून असल्याचे सांगितले . शेतकऱ्यांना शेती व पीक विषयक काही अडचणी निर्माण झाल्यास कृषी विभागाकडे कधीही संपर्क साधल्यास आमचे विभागाकडून त्यांना तातडीने मदत व मार्गदर्शन करण्यात येईल ,

यावेळी गावातील ग्रामस्थ व शिक्षक बंधूंनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या प्रगतशील शेतकरी दत्तात्रय भोसले .सोलापूर जिल्हा अन्नप्रक्रिया समन्वयक दुपडे मॅडम. उपसरपंच लक्ष्‍मण गोडसे. प्रकाश जाधव. चंद्रदिपक भालेकर. आनंद भोपळे. एम बी जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख के के जाधव सर यांनी करून दिली.

कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ जाधव. स्वीकृत संचालक दशरथ जाधव, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे. पोलीस पाटील दत्तात्रय जाधव .तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बजरंग जाधव .कृषी सहाय्यक विशाल नागटिळक.  सत्कार सोहळा समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी .डी गोडसे सर रमेश जाधव सर यांनी केले तर आभार नितीन पाटील गुरुजी यांनी मानले.