पंढरपूर बसस्थानकावरील पोलीस चौकी पडली धूळखात...

पंढरपूर बसस्थानकावरील पोलीस चौकी पडली धूळखात...

_________________________________________________

पंढरपूर : दै.पंढरी- नगरी न्यूज :- पंढरपूर हे राज्याचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी राज्य तसेच परराज्यातून  नागरिक दररोज हजारोंच्या संख्येने विठ्ठल रूक्मिणी दर्शनाकरिता एस टीने येत असतात परंतु या राज्यातील बसस्थानकांमध्ये मोठे असलेल्या पंढरपूर बसस्थानक येथे मागील काही दिवसांमध्ये दागिने व पैसे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसुन येत आहे विषेश म्हणजे या ठिकाणी एक पोलीस चौकी आहे परंतु ती धूळखात पडलेली दिसून येत आहे आणि भरपूर व मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तरीदेखील येथे चोरी झालेल्या अनेक घटनांचा तपास लागत नसल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसुन येत आहे याबाबत निदान अतातरी या बसस्थानकाचे आगार प्रमुख व पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी देऊन या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे मत पंढरपूर आम आदमी पार्टीचे सचिव नागेश पवार यांनी व्यक्त केले आहे जेने करून येथिल चोरी होण्याच्या वाढत्या घटनांना आळा बसवण्यास मदत होईल.