मातोश्री ईश्वरांना विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर :( दै. पंढरी नगरी न्युज) : मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व जुनिअर कॉलेज या प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन उद्योजक महेश साठे ,रोहिणी साठे सदस्य, लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत यांचे शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व मैदान व खेळ साहित्याचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महेश साठे म्हणाले की, जीवन जगत असताना संघर्षाचा सामना करा. संघर्ष शिवाय यश नाही. कष्टाबरोबर आत्मविश्वास जागृत ठेवून ध्येय निश्चित करा व रात्रीचा दिवस करून ध्येयापर्यंत पोहोचा. भविष्यात आपले उत्पन्नातील काही भाग गोरगरिबांच्या झोपडीतील मुलांसाठी खर्च करून त्यांना आपलेसे करा. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शारीरिक, मानसिक, बौद्धिकतेच्या जोरावर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
प्राचार्या नंदिनी गायकवाड म्हणाल्या की मुलांनी कोविड-१९ च्या नियमाचे पालन करुन मुलांना सर्दी ,खोकला, ताप आल्यास तात्काळ औषधोपचार घेण्याचे व सतत हात धुवून मास्क वापरण्याचे आवाहन केले. प्रतिवर्षाप्रमाणे क्रीडा शिक्षिका कुमुदिनी सरदार यांनी मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी व सांघिकता वाढीस लागावी या उद्देशाने प्रशालेत वैयक्तिक व सांघिक खेळाचे नेटकेपणाने नियोजन करून क्रीडा सप्ताहाची उत्साह पूर्ण वातावरणात सुरुवात केली. यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी केले .तर आभार सविता लोखंडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके, फरहाणा कादरी, कल्याणी कांबळे ,स्वाती कोळेकर, इरफान शेख गणेश डुबल, विजय भंडारे अभिजीत कोष्टी, प्रशांत शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.