श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी रविवार दि. २३ रोजी ऊसपिक परिसंवादाचे भरगच्च आयोजन..

श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी रविवार दि. २३ रोजी ऊसपिक परिसंवादाचे भरगच्च आयोजन..

------------------------------------------------------------------------------------

गुरसाळे (पंढरी नगरी न्युज ) श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर, गुरसाळे ता.पंढरपूर यांच्या वतीने रविवार दिनांक २३ रोजी शेतकरी सभासद यांना ऊसपीक शेती विषयी परिसंवाद चर्चासत्र आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री. विठ्ठल चे 'चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी दिली.

ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवासने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल परिवाराचे युवा नेते तथा विठ्ठलचे 'चेअरमन अभिजीत (आबा) पाटील हे उपस्थित राहणार आहेत ,तर ऊस पीक परिसंवादाचे प्रमुख म्हणून ऊसतज्ञ ,कृषी भूषण ,कृषीरत्न संजीव माने हे सकाळी १०:०० ते दुपारी १:०० पर्यंत ऊस पिक उत्पादन समस्या व उपाय या विषयावर अनुभवी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे बदलते हवामान व ऊस शेती या विषयावर दुपारी २:०० ते ४:०० पर्यंत माहितीपर मार्गदर्शन करणार आहेत. ऊस पिक परिसंवादाचे कार्यक्रमाचे ठिकाण सद्गुरु मंगल कार्यालय पुणे पंढरपूर रोड गोसावी पेट्रोल पंपा समोर वाखरी येथे होणार आहे .ऊस पिक परिसंवादसाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसाठी दुपारी १:०० ते २:०० पर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

तरी कार्यक्रमास संचालक मंडळ, माजी संचालक, तालुक्यातील शेतकरी, सभासद कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी, वाहन मालक, कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. आर. गायकवाड यांनी केली आहे.