श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे कविवर्य वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिना निमित्त मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा...
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै.पंढरी नगरी नगरी न्यूज ) - श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे आज दिनांक २७/०२/२०२६ शुकवार रोजी सकाळी ठिक ११-०० वाजता कवीवर्य वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिना निमित्त मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
प्रथमतः वि.वा.शिरवाडकर यांच्या फोटोचे पुजन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ,संचालक धिरज कुंकूलोळ,आनंद सुराणा श्री जैनाश्रमचे ऑ.सेक्रेटरी दिनेश श्रीश्रीमाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,सहा.ग्रंथपाल शितल लुकडे,क्लार्क विरज पतंगे हे उपस्थित होते सुत्रसंचालन व आभार वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केले.