बार्शीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य डॉ. एस .एस .गोरे यांची नॅक मूल्यांकन समितीवर निवड.... कर्मवीर जगदाळे मामाचा आदर्श घेऊन शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवणार- प्राचार्य गोरे

बार्शीच्या  शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे  आदर्श प्राचार्य डॉ. एस .एस .गोरे यांची नॅक मूल्यांकन समितीवर निवड....  कर्मवीर जगदाळे मामाचा आदर्श घेऊन शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवणार- प्राचार्य गोरे

------------------------------------------------------------------------------------

बार्शी ( दै पंढरी नगरी न्यूज) येथील कर्मवीर डॉ .मामासाहेब जगदाळे संस्थापित श्री .शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथील प्राचार्य डॉ एस.एस.गोरे यांची विद्यापीठे व महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्था मूल्यांकन करणारी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) स्वायत्त संस्था नॅशनल असेसमेंट अँड अँक्रेडिटेशन काऊन्सिल तथा नॅकच्या मूल्यांकन समितीवर निवड झाली आहे.

 

प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे हे ३० वर्षापेक्षा अधिक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देतआहेत.त्यांनी महाविद्यालयात राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा,कार्यशाळा व परिसंवादाचे यशस्वी आयोजन करून शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय मतदान जाणीव जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन ,महिला सबलीकरण या संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक चळवळीला चालना दिली आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत साक्षरता, जलसंधारण, महिला बचत गट,स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक जनजागृती, नवकृषी तंत्रज्ञान,आपत्ती निवारण इत्यादी संदर्भात कार्यशाळा आयोजित करून ग्रामीण भागातील जनतेचे उद्बोधन केले आहे. महाविद्यालयातील मुली व महिला कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, कायदेविषयक तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करून ठोस असे उपक्रम राबविले आहेत. महाविद्यालयाच्या भौतिक सुविधेत जलतरण तलाव, इन डोअर हॉल, ४०० मीटर ट्रॅक , कॉलेज परिसरात २५० पेक्षा जास्त वृक्षारोपण आदी बाबतीत योगदान दिले आहे.               

महाविद्यालयात बी.एड.बी.पी.एड. एम.पी. एड. एम.एड., एम. ए. एज्युकेशन, डी. एस.एम., पी. एच.डी.संशोधन केंद्र इ.अभ्यासक्रम सुरू आहेत. या प्रत्येक विभागांच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यापीठ परीक्षांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिवर्षी अव्वल क्रमांकावर राहिले आहेत.क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान कामगिरी बजावली आहे.राज्य ,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त केले आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यांकनात सरांच्या नेतृत्वाखाली "अ"श्रेणी प्राप्त केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सरांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात ३.०४ सीजीपीए गुण मिळवून अ श्रेणी प्राप्त केली आहे.

प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण ६० शैक्षणिक परिषदा,कार्यशाळा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मासिका मधून जवळपास ५० संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.शिक्षण क्षेत्रातील एकूण ९ शैक्षणिक ग्रंथाचे लेखन केले आहे. एकूण ११ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.व १२ विद्यार्थ्यांनी एम.फिल.या पदव्या संपादन केल्या आहेत. प्राचार्य गोरे यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, सिनेट, अभ्यासमंडळ, अधिष्ठाता अशा विविध प्राधिकरणावर यशस्वीपणे कार्य केले आहे. सर हे एनसीटीई न्यू दिल्लीचे व्ही.टी.मेंबर म्हणून कार्य करत आहेत. या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन सन २०१९ मध्ये सोलापूर विद्यापीठाने त्यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान केला आहे.त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले . तसेच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेने प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांना राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले असून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे शिक्षक गौरव पुरस्कार शैक्षणिक वर्ष२०२३ अंतर्गत उत्कृष्ट शाखा प्रमुख पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. 

नॅकच्या मूल्यांकन समितीवर निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ एस.एस.गोरे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. राजाराम इंगोले (खोमनाळ), आंबेचिंचोली येथील प्रगतशील बागायतदार सुशील पाटील (मंगळवेढा), वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव (सिद्धेवाडी), श्री. आबासाहेब पवार (पंढरपूर), शेटफळ (त.) ग्रामपंचायतच्या सरपंच नूतन मासाळ, उपसरपंच व ग्रामस्थ,श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे साहेब, जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील , जॉइंट सेक्रेटरी अरुण देबडवार सर,खजिनदार जयकुमार शितोळे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.