शहाजी शेनवे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित..

शहाजी शेनवे  सोलापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित..

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज) सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सिद्धेवाडी ग्रामपंचायतचे उत्कृष्ट ग्रामसेवक शहाजी शेणवे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने सन 2023 या वर्षाकरिता सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचा कारभार करीत असताना त्यांच्या सेवेतून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवकास आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सिद्धेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शहाजी शेणवे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. आज पंढरपूर येथील श्री. यश पॅलेस मंगल कार्यालयात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेणवे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागातील विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.