खेडभोसे गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी आरक्षणासाठी ठोस भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक..

खेडभोसे गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी  आरक्षणासाठी ठोस भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक..

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून सर्वपक्षीय आमदार , खासदार तसेच अन्य नेते मंडळी हे ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे सकल मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, खेडभोसे गावात सर्व समाजाने एकमुखाने सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपस्थित मराठा युवकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी तसेच विरोधी सर्वपक्षीय नेत्यांना घारेवर धरले. या बैठकीत  'जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत खेडभोसे गावात राजकीय नेत्याना गावबंदीचा इशारा देण्यात आला. प्रवेश बंदी असतानाही एखाद्या राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्यास, त्यानंतर होणाऱ्या मानापमानास तो नेता स्वतः जबाबदार असेल, असा सूचक इशाराही यावेळी देण्यात आला.

"चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष", "जो समाजाला मानत नाही, त्याला समाज मानत नाही", अशा आशयाचे बॅनर खेडभोसे गावात लावण्यात आले आहेत.