न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढाचा विद्यार्थी- यशराज शिंदे गायन स्पर्धेत प्रथम- सिद्धेवाडी ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( पंढरी नगरी न्युज) मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विद्यालयातील विद्यार्थी यशराज विशाल शिंदे यांनी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले .मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयात व इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये यशराज शिंदे यांनी प्रसिद्ध संगीतकार व गायक अजय - अतुल जोडीने गायलेले विठ्ठल ,विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल तूला साध आलि तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेत घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट देण्या भीमाची निघाली तुझ्या नामा घोषात इंद्रायणी विठ्ठल... या गीताने आलेल्या स्नेहसंमेलनातील उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल यशराज शिंदे यांना प्रशालेकडून प्रशिक्षित पत्र सन्मान चिन्ह देऊन स्वागत पर सन्मान करण्यात आला. यशराज शिंदे हा इ. ७ वी .मध्ये शिकत असून तो सिद्धेवाडी ता. पंढरपूर येथील रहिवासी आहे.
त्याच्या या यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा अध्यक्ष सुजित कदम, प्राचार्य रवींद्र काशीद ,वर्गशिक्षिका पाटील मॅडम तसेच सिद्धेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी सारंग जाधव, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ जाधव, जवाहरलाल नेहरू हायस्कूल माजी मुख्याध्यापक डी .डी गोडसे सर ,वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे ,उपसरपंच लक्ष्मण गोडसे, पोलीस पाटील दत्तात्रय जाधव ,महात्मा गांधी तंटामुक्तसमितीचे अध्यक्ष बजरंग जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ ननवरे सर्व सदस्य, गायन विशारद शिक्षक रामदास रोंगे, पालक विशाल शिंदे ,आजोबा बबन( दाजी) शिंदे विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी यांनी छोट्याशा यशराज शिंदे यांचे कौतुक करून अभिनंदन केले.