सोलापुरात दोन गटात तूफान दगडफेक; पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) सोलापूरच्या शास्त्री नगर परिसरात बुधवारी मध्यरात्री दगडफेक झाली. मात्र कोणत्या कारणांवरुन ही दगडफेक झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीत काही तरुण झाले जखमी झाले आहेत.
सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोलापूरमध्ये दोन गटात दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. सोलापूरच्या शास्त्री नगर परिसरात मध्यरात्री दगडफेक झाली. दरम्यान, वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढचा अनर्थ टळला. या दगडफेकत दोन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
कारण अस्पष्ट.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या शास्त्री नगर परिसरात बुधवारी मध्यरात्री दगडफेक झाली. मात्र कोणत्या कारणांवरुन ही दगडफेक झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीत काही तरुण झाले जखमी झाले आहेत. तर दगडफेक करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळं परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.