डॉ. हरी भोसले यांना यंदाचा राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार सोलापूर येथे प्रदान... पंढरपूर तालुक्यातीत उत्साहाचे वातावरण
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर ( पंढरी नगरी न्यूज ) 3 सप्टेंबर 2023 रोजी डॉ. हरी कृष्णा भोसले सर यांना, राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार, डॉ ज्योतीताई शेटे ( अध्यक्ष - महाराष्ट्र निसर्गोपचार तज्ञ परिषद) यांचे हस्ते, सोलापूर चे खासदार, डॉ.जयसिध्देश्वर महास्वामिजी यांचे उपस्थिती देण्यात आला. सोलापूर - अक्कलकोट रोड वर वळसंगवाडा, निसर्ग विहार, येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र राज्य व भारत देशभरात निसर्गोपचार या आरोग्य क्षेत्रामध्ये निरंतर सेवादान - योगदान, समर्पण या बद्दल हा पुरस्कार दिला जात आहे .डॉ. हरी भोसले हे मुळचे पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील रहिवासी आहेत .ते या क्षेत्रात कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने मित्र परीवार, राजकीय,पत्रकार,सामाजिक,शैक्षणिक,कला व क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीकडून शुभेच्छा देऊन त्याचे कौतुक केले जात आहे.
आरोग्यम् भारत, सी. एन. इ. टी., एस. एन.ओ., एन.डी.ए.व सोलापूर नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन सोलापूर, यांचे संयुक्त अभियान अंतर्गत, या वर्षाचा दिला जाणारा, "राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार: 2023-24, देऊन डॉ हरी भोसले सर यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात महारष्ट्र व देशभरातील अनेक निसर्गोपचार नामांकित तज्ञ डॉक्टरांना आरोग्य दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी SNO - SOLAPUR व आरोग्यम् भारत अंतर्गत CNET PROGRAM तसेच राष्र्टीय पूरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य उपअभियंता नीलकंठ मठपती उपस्थित होते.
कार्यक्रमास डाँ . योगीन गुर्जर , डाॅ. क्रांतीवीर महिंद्रकर ,SNO चे अध्यक्ष डाॅ. श्रीकांत सर, सामाजिक वनिकरण विभागाचे मुख्य लेखपाल व राष्ट्रीय टेनिस खेळाडू सिलव्हर मेडल विजेत्या सौ. संध्यारांनी बंडगर व सर्व निसर्गउपचार तज्ज्ञ, डॉक्टर वर्ग, समाजसेवक, विविध संस्था चे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.