श्री विठ्ठल सह. कारखाना व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन कारखाना कार्यस्थळावर साजरा...
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर:( दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल सह. साखर कारखाना लि., वेणूनगर येथे दिनांक ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करणेत आला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखाना परिसरामध्ये कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे मॅडम यांचे शुभहस्ते सकाळी १०.०० वाजता प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले. तसेच कारखाना परिसरामध्ये व कामगार वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबविणेत आले व पर्यावरणाचे महत्व पटवून देणेसाठी कारखाना परिसरामध्ये व कामगार वसाहतीमध्ये डिजीटल बोर्ड लावणेत आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड म्हणाले की, ५ जून जागतिक पर्यावरण दिन व कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे १ ऑगष्ट २०२४ या ४१ व्या वाढदिवसापर्यंत कारखाना परिसरात १०००० रोपे लावण्याचा संचालक मंडळाने संकल्प केला आहे.
या प्रसंगी कारखान्याचे संचालक कालिदास पाटील, संभाजी भोसले, दत्तात्रय नरसाळे, कालिदास साळुंखे, नवनाथ नाईकनवरे, सिध्देश्वर बंडगर, तज्ञ संचालक अशोक तोंडले व दशरथ जाधव, निमंत्रित संचालक अंगद चिखलकर, वर्क्स मॅनेजर यु.के. तावरे, चिफ केमिस्ट बी. आर. माने, डिस्टीलरी मॅनेजर एन. एस. सोळंके, केन मॅनेजर एस. एस. बंडगर, सेल्स ऑफीसर महेश घाडगे, ऊस विकास अधिकारी श्री उध्दव बागल, केनयार्ड इंन्चार्ज जयंत सलगर, पर्यावरण केमिस्ट एस.बी. गायकवाड, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.