कडलास येथील प्रगतशील शेतकरी सुरेश गायकवाड यांचा खा .शरद पवारांच्या हस्ते कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित
------------------------------------------------------------------------------------
सांगोला (पंढरी नगरी न्युज ) सांगोला तालुक्यातील कडलास येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार सुरेश गायकवाड यांचा देशाचे माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा सोहळा १६ नोव्हेंबर रोजी माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात कृषीनिष्ठ परिवारांचा उत्कृष्ट शेती सेवेसाठीचा कृषीनिष्ठ पुरस्कार गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

सुरेश गायकवाड यांनी कृषी क्षेत्रात द्राक्ष डाळिंब काकडी ऊस केळी या पिकांवर यशस्वी प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेतले त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले याची कार्याची दखल घेऊन कृषीनिष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आली या अगोदरही सुरेश गायकवाड यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा अनेक शेती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नितीन कापसे आणि परिवारातर्फे कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्यात आहे. या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते ,कडलास चे सुरेश गायकवाड यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन या सेवेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे, राज्याचे राष्ट्रवादी उद्योग विभाग सेलचे अध्यक्ष तथा वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक नागेश फाटे ,माजी आमदार विनायकराव पाटील, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनाजी साठे ,नगराध्यक्ष मीनल साठे, संजय पाटील घाटणेकर, श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे ,द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सोपान कांचन ,दादासाहेब साठे, भारत जाधव ,अँड. बाळासाहेब पाटील, सिद्धेवाडी( ता. पंढरपूर) येथील प्रगतशील ऊस बागायतदार बलभीम जाधव ,रमेश बारस्कर ,बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, दत्ता गवळी, योगेश जाधव, उपस्थित होते.