पंढरपूर आर. पी .आय रामदास आठवले गटाचा कार्यकर्ता मेळाव्यास मोठी गर्दी,रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)गटाचा सोलापूर जिल्हा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. हया कार्यक्रमात विविध विषयांबदल कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली तसेच आता येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका लोकसभा विधानसभेच्या तयारी करण्याचे सांगण्यात आले. पदाधिकाऱ्यांना गावभेठी खेड्या पाड्यात जाऊन गोरगरिबांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले सर्वांनी मिळून एकीची मोट बांधण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.रामदासजी आठवले साहेब तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे साहेब कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रिपाइं महा.राज्य सचिव मा.सुनिलजी सर्वगोड प्रमुख उपस्थिती रिपाइं महा.राज्य मा.बापुसाहेब जगताप, पच्छिम महाराष्ट्र चे जितेंद्र बनसोडे, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत वाघमारे, नागनाथ ओव्हाळ, हनुमंत कसबे, एन.के.साळवे, दयानंद धांईजे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले सोलापूर जिल्हा सरचिटणीस शामसुंदर गायकवाड कार्यक्रमाचे निमंत्रक रिपाइं पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष पवार, शहर अध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, युवक तालुका अध्यक्ष योगेश जाधव, युवक शहर अध्यक्ष विशाल मांदळे हे होते.
तसेच कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा कार्यकारिणी, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.