जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ई ग्रंथालय आज्ञावली व "ग्रंथमित्र" फलकाचे उद्घाटन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ई ग्रंथालय आज्ञावली व "ग्रंथमित्र" फलकाचे उद्घाटन,  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) सोलापूर जिल्ह्यातील "अ "वर्ग ग्रंथालयासाठी " ई " ग्रंथालय आज्ञावली संदर्भात माहिती देण्याकरिता शुक्रवार दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथे सभा संपन्न झाली असून सभेचे प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले तर उपस्थित अ वर्ग ग्रंथालय सेवक, कार्यकर्ता व सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथमित्र व्यक्ती यांचे स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले .यावेळी ग्रंथालय अज्ञावलीची विस्तृत माहिती प्रमोद पाटील यांनी उपस्थितांना दिली. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे सुनिल हुसे यांनी दिली. 

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रंथमित्र व महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दिलेल्या संस्थेच्या नावाच्या फलकाचे अनावरण ग्रंथमित्र दत्तात्रय बाबर ग्रंथमित्र कुंडलिक मोरे व ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रंथमित्र व्यक्ती व संस्था यांच्या फलकाचे अनावरण जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे होणार असल्याची माहिती सुनिल हुसे दिली हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथमित्रांची ओळख यामुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ता व सेवक यांना होणार आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

यावेळी दत्ता मोरे, पुनम शिंदे, वृषाली हजारे ,संजय सरगर ,कुमार चन्ना ,ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रवीण पाठक ,संतोष भोसेकर, सुरेश यादव ,दत्तात्रय बाबर ,प्रदीप गाडे यल्लप्पा घोडके, रणजीत भंडारे , 

रमा इप्पलपल्ली,विजयालक्ष्मी क्षिरसागर ,प्राजक्ता वाघीरकर ,किरण पाटील,चौधरी ,रोहित साळुंखे, जगदीश ईमडशेट्टी यांच्यासह कार्यकर्ते व सेवक उपस्थित होते. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.