बार्शी येथील श्री. वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी....

बार्शी येथील श्री. वर्धमान जैन सार्वजनिक  वाचनालयात स्वामी विवेकानंद  जयंती साजरी....

-----------------------------------------------------------------------------------
  
बार्शी (पंढरी नगरी न्यूज )- श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे आज दिनांक 12/1/24 शुक्रवार रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्री माळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  

यावेळी वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी  लिपिक विराज पतंगे सहा.ग्रंथपाल- पल्लवी तौर मॅडम,हे उपस्थित होते. तसेच वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालक धिरज कुंकूलोळ यांनी आभार मानले.त्यानंतर  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.