बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज): येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथम प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी भागवत बोबडे, सुहास सुतार, पांडुरंग आस्वदे, दत्तात्रय मिटे, निलेश आस्वादे, चंद्रकांत पवार, हनुमंत तुपे यांचेसह सभासद, वाचक आदी उपस्थित होते. ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.