प्राचार्य .डॉ .एस .एस गोरे यांना उत्कृष्ट शाखाप्रमुख पुरस्कार

प्राचार्य .डॉ .एस .एस गोरे यांना उत्कृष्ट शाखाप्रमुख पुरस्कार

---------------------------------------------------------------------------------

बार्शी( पंढरी नगरी न्यूज) श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे शिक्षक गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथील प्राचार्य डॉ एस एस गोरे यांना सन 2023 च्या उत्कृष्ट शाखाप्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे व पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी पाटील, जॉईन सेक्रेटरी ए पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त यांच्या वतीने प्राचार्य डॉ. एस एस .गोरे यांचा उत्कृष्ट शाखाप्रमुख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे होते.

प्राचार्य डॉ .सुग्रीव गोरे गेली 30 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत आहेत.त्यांनी महाविद्यालयात राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा,कार्यशाळा व परिसंवादाचे यशस्वी आयोजन करून शैक्षणिक प्रश्नांना  वाचा फोडण्याचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे  राष्ट्रीय मतदान जाणीव जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन , महिला सबलीकरण या संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक चळवळीला चालना दिली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत साक्षरता, जलसंधारण, महिला बचत गट, स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक जनजागृती, नवकृषी तंत्रज्ञान,आपत्ती निवारण इत्यादी संदर्भात कार्यशाळा आयोजित करून ग्रामीण भागातील जनतेचे उद्बोधन केले आहे.महाविद्यालयातील मुली व महिला कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, कायदेविषयक तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करून ठोस असे उपक्रम राबविले आहेत. महाविद्यालयाच्या  भौतिक सुविधेत जलतरण तलाव, इन डोअर हॉल, 400 मीटर ट्रॅक ,  कॉलेज परिसरात 250 पेक्षा जास्त वृक्षारोपण आदी बाबतीत योगदान दिले आहे.
                
महाविद्यालयात बी.एड.बी.पी.एड. एम.पी. एड. एम.एड., एम. ए. एज्युकेशन, डी. एस.एम., पीएच.डी.संशोधन केंद्र इ.अभ्यासक्रम सुरू आहेत. या प्रत्येक विभागांच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यापीठ परीक्षांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिवर्षी अव्वल क्रमांकावर राहिले आहेत.क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान कामगिरी बजावली आहे.राज्य ,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त केले आहेत. सोलापूर  विद्यापीठाच्या  शैक्षणिक आणि प्रशासकीय मूल्यांकनात सरांच्या नेतृत्वाखाली अ श्रेणी प्राप्त केली आहे.
                 
प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील  60 शैक्षणिक परिषदा,कार्यशाळा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मासिका मधून जवळपास 50 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.शिक्षण क्षेत्रातील 9 शैक्षणिक ग्रंथाचे लेखन केले आहे. 11 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.व 12 विद्यार्थ्यांनी एम.फिल.या पदव्या संपादन केल्या आहेत. या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन सन 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठाने त्यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान केला आहे.त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे . तसेच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेने प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांना राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले आहे. सरांना कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे शिक्षक गौरव पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट शाखा प्रमुख पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने प्राचार्य गोरे सरांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.