बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...

बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...

------------------------------------------------------------------------------------

बार्शी(दै.पंढरी नगरी न्यूज ) बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात गोरगरिब, दीनदलित,शोषित, वंचित,कष्टकरी,कामगारांचे कैवारी,थोर कायदेतज्ज्ञ,भारतीय घटनेचे शिल्पकार,वि श्वभूषण, युगपुरुष, महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. या औचित्याने प्रमुख मान्यवरासह वैभव जगताप, विवेक कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख मान्यवर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख, सचिव मधुकांतजी ठोकळ, सामाजिक कार्यकर्ते सुहासबप्पा सुतार, गायक सुनिल फल्ले आदी उपस्थित होते.

यावेळी गायक सुनिल फल्ले एक गीत सादर करीत या गीताच्या माध्यमातून घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्वलंत इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आर्यन पोकळे, बाळासाहेब पोकळे, शौनक अग्रवाल, रुद्र मिरगणे, अक्षय पोकळे, सार्थक कुर्ले यांचेसह सभासद व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले तर आभार हनुमंत तुपे यांनी मानले.