पंढरपूर तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाच्या चेअरमनपदी शांतिनाथ (दादा )बागल यांची बिनविरोध निवड..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी गादेगांव येथील शांतिनाथ बाबुराव बागल यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. एन. सुळ यांनी दिली .पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक दिनांक २६/६/२०२३रोजी बिनविरोध पार पडली होती .त्यानंतर आज शुक्रवार दिनांक २१ रोजी, दु.चेअरमन पदाची निवडणूक घेण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी पी .एन. सुळ यांनी नतुन संचालक मंडळाची सभा बोलण्यात आली होती.
या सभेत चेअरमन पदासाठी शांतिनाथ बाबुराव बागल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुळे यांनी घोषित केले .यावेळी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते पंढरपूर तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाचे नूतन चेअरमन शांतिनाथ बागल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, राष्ट्रवादी व्यापार व उद्योग सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम ,पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक अमरजीत पाटील, सुभाष हुंगे- पाटील, मोरे महाराज, राजाराम गायकवाड, शहाजी नागणे, अमोल चव्हाण, अरुण कवडे, सचिन पाटील, पोपट दांडगे, राहुल पाटील इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमास नूतन संचालक---, रामकृष्ण जवळेकर ,तुकाराम कचकल ,कुंडलिक बेद्रे ,अण्णा शिंदे ,विलास शिंदे ,पिंटू भोसले, नारायण गायकवाड ,अंकुश येडगे ,अभिषेक पुरवत, योगेश हाके, फारुक मुलानी ,मनोज मस्के ,शामल शहाजीराव नागणे ,स्मिता राजेंद्र भोसले इत्यादी उपस्थित होते.