आदर्श प्राचार्य पुरस्कार विजेते डॉ. सुग्रीव गोरे सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण व डॉ .सुग्रीव गोरे यांना राष्ट्रीय नामांकित आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचा सपत्नीक ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी सत्कारसमारंभास उत्तर देताना स्वतः च्या आयुष्यात वयाच्या १३ व्यावर्षी वडिलाची छत्र छाया हरवले त्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जाऊन शिक्षण घेत असताना ज्या समस्येतून त्यांनी शिक्षण घेतले त्याची आठवण करत डॉ. गोरे यांचा कंठ दाटून आला त्यांचे अश्रू अनावर झाले . त्यांनी अतिशय अडचणीतून हाल अपेष्टा सहन करून शिक्षण घेतले चे सांगितले. राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा गावच्या सार्वजनिक ग्रंथालय व ग्रामस्थांनी आयोजीत केलेल्या माझ्या सत्काराचा खूप मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी सांगत ग्रामस्थांच्या वतीने माझा भव्य नागरी सत्कार केला मी कधीही उतराई होऊ देणार नाही असे सांगितले.
यावेळी सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे नेते ज्योतीराम बोंगे गुरुजी यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत हे वाचनालय नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवित असले बाबत गौरवोद्गार कादून उपस्थितीत श्रोत्यांना आपल्या अभ्यास पूर्ण भाषणाने मंत्रमुग्ध केले . महाराष्ट राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य ग्रंथमित्र गुलाबराव पाटील सर यांनीही आपल्या भाषणात वाचनालयाच्या विविध उपक्रमाचे भरभरुन कौतुक करून " शाळा दतक " योजना प्रभावीपणे राबवावी अशा अपेक्षा व्यक्त केली . ग्रंथालय संघाचे संचालक व सहसचिव अनुकमे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ज्योतीराम गायकवाड सर जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव अन्सार शेख यांनीही आपले विचार व्यक्त केले . यावेळी शेटफळ गावचे माजीसरपंच मारुती मासाळ यांनीही अतिशय जोशपूर्ण विचार मांडून शत्रुघ्न कांबळे यांच्या प्रति तोंडभरून कौतुक केले.
यावेळी भारत देशातील नामांकित आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाले बद्दल डॉ . सुग्रीव गोरे यांचा वाचनालय व ग्रामस्थाच्या वतीने सपत्निक शाल व पुष्पहार देवून नागरी सत्कार करण्यात आला . समर्थ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संजय गवळी सरांकडून कार्यक्रमाचे आयोजक वाचनालयचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न कांबळे सरांचा सत्कार श्री विठ्ठलाची मूर्ती शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केला. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.सदस्य, पोलीस पाटील, प्राचार्य सुग्रीव गोरे यांच्या पत्नी शैलजा गोरे, गावातील तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शशिकांत कांबळे गुरुजी यांनी केले तर आभार समर्थ स्कूलच्या श्रीमती गोडसे मॅडम यानी मानले.