चैत्री यात्रा काळात भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी सहा औषधोपचार केंद्र सज्ज ; तालुका आरोग्य अधिकारी - डॉ.एकनाथ बोधले

चैत्री यात्रा काळात भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी सहा औषधोपचार केंद्र सज्ज ;  तालुका आरोग्य अधिकारी - डॉ.एकनाथ बोधले

---------------------------------------------------------------------------------
सुसज्ज ६ रुग्णवाहिका, १२० आरोग्य अधिकारी कर्मचारी
---------------------------------------------------------------------------------
             
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) चैत्री  यात्रेमध्ये पंढरपूरात येणारे भाविक आरोग्यसंपन्न रहावे. तसेच  यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक  वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा असून, भाविकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी  ६  ठिकाणी औषधोपचार केंद्र  उपभारण्यात आले असून, त्यामध्ये १२०आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देण्यात आहे. तसेच शहरात ७ ठिकाणी सर्व सुविधायुक्त ६ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ यांनी दिली.
            
चैत्री यात्रेच्या कालावधीत आरोग्याची आवश्यक काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका आरोग्य विभाग तसेच तालुका आरोग्य विभागाकडून  पत्राशेड, वाळवंट, दर्शन मंडप, पोलिस संकुल, ६५ एकर, गोपाळपूर येथे औषधोपचार  केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार रक्तपेढीची सोय करण्यात आलेली आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णासआरोग्यसेवा देण्यास तत्पर आहे. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेड,  आयसीयू विभाग तयार करण्यात आला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले यांनी सांगितले.