महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचे पहिले काम क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी केले ; समाजसेवक ! सुहास सुतार
---------------------------------------------------------------------------------
बार्शी (प्रतिनिधी): पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिकारक विचारवंत,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक,थोर समाजसुधारक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी मोठे कार्य केले असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते सुहास बप्पा सुतार यांनी व्यक्त केले . ते बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची यांची १९७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी बोलत होते. प्रथमता क्रांतीसुर्य म.फुले त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विजयसिंह देशमुख,पांडुरंग आस्वादे,नितीन गव्हाणे,सोमनाथ गायकवाड,बजरंग आस्वादे,सुवेल गोरे,रुद्र मिरगणे यांचेसह सभासद व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.