कौठाळीतील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास, टाळाटाळ करणाऱ्या बॅक अधिकाऱ्यावर कारवाई करावी -, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी
----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : तालुक्यातील कौठाळी गावांमध्ये बॅक ऑफ बडोदा शाखा असून कौठाळी व परिसरातील सुमारे 14 गावातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अकार्यक्षम बॅक मॅनेजरवर कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांनी केली आहे . प्रकारचे निवेदन नायब तहसीलदार पंढरपूर यांना दिले आहे.
बॅक ऑफ बडोदा शाखा असून ही बॅक कौठाळी गावाला दत्तक आहे .या बॅकेत सुमारे १० ते १२ गावातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे परंतु शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बॅकेकडून सतत टाळाटाळ केली जात असल्यामुळे शेतकरी अक्षरक्षा हेलपाटे मारून बेजार झाला आहे.
कौठाळी हे गाव दुष्काळात समाविष्ट असून शासनाच्या नियमानुसार बॅकेला शासनाने कर्ज पुरवठा केला पाहिजे अशा फतवा असताना हे बॅक अधिकारी नियमांचे उल्लंघन करीत असून शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे.
तसेच पशू लोन, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, मुद्रा लोन, क्रेडिट लोन, लाभार्थ्यांना वंचित ठेऊन शेतकऱ्यांच्याचे संबंधित अधिकारी हे शोषण करीत असून ह्या शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा न केल्यास तसेच यामध्ये बँकेच्या वरिष्ठ वरील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा मार्गे न लावल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे, यावेळी सचिन घोडके, रामचंद्र घोडके, बापू नागटिळक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.