पंढरपूर तहसील कार्यालयातील वादग्रस्त ,कामचुकार पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांची अखेर चौकशी सुरू, जिल्हा पुरवठा अधिकारी-- संतोष सरडे
◼️ पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या पैशाच्या मागणी व वागणुकीमुळे पुरवठा विभागाची आज पर्यंतची मोठी बदनामी ,
◼️ सदानंद नाईक हे गेले कित्येक वर्ष एकाच ठिकाणी खुर्चीला चिटकून बसले आहेत. त्यामुळे ते दुकानदार व नागरिकांना त्रास देण्याचे धाडस करीत असल्याची चर्चा.
◼️ पुरवठा निरीक्षक नाईक यांची संपूर्ण खातेनिहाय व मालमत्ता चौकशी करा नागरिकांची मागणी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे शिधापत्रिकाधारक व रेशन दुकानदारांकडून सतत पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने होत होत्या पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांचा पुरवठा कार्यालयात मनमानी कारभार सुरू आहे ते कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत शिधापत्रिकाधारकाकडे पैशाची मागणी करून मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत .शिधापत्रिका ऑनलाइन नोंदणीसाठी शिधापत्रिका धारकाकडून ऑनलाईन पैसे घेतल्याचे पुरावे सापडले आहेत.
शिधापत्रिका धारकांना अरेरावीची भाषा वापरून त्यांना अपमानास्पद वागणूक देणे अशा अनेक तक्रारी नाईक यांच्यावर दाखल आहेत ,हे असून सुद्धा वरिष्ठ पातळीवरून कोणतीही दखल घेतली जात नव्हती अखेर सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे ह्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे जनसंपर्क अभियान निमित्त बैठकीत आले असता बैठकीत ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या मनमानी कामचुकारपणा करणे, सतत बाहेर थांबून फोनवर बोलने व आडवणूक करीत असल्याच्या तक्रारी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आले होत्या. त्यानंतर नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्याकडे सदानंद नाईक यांची तक्रार केली होती याच तक्रारीची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पुरवठा निरीक्षक नाईक यांच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे, ही समिती आठ दिवसांमध्ये आपला अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सादर करणार आहे.
या समितीमध्ये पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन इथापे सहाय्यक पुरवठा अधिकारी मनोज डहारे ,पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरी आणि मोहोळचे पुरवठा निरीक्षक महालिंग लोंढे यांचा या समीतीत समावेश आहे. यामुळे पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर चौकशी समिती नेमलेल्या मुळे पंढरपूर तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली तर तालुक्यातील नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत .कामचुकार पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर आता कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.