मोहोळ येथे शुभारंभ अर्बन निधी लिमिटेड संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न..

मोहोळ  येथे शुभारंभ अर्बन निधी लिमिटेड संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न..

-------------------------------------------------------------------------------

बेगमपुर;(दै पंढरी  नगरी न्यूज ): अर्बन निधी लिमिटेड बेगमपुर    संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त बेगमपूर ता. मोहोळ येथे  रविवारी दिनांक २० नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला हार घालून सरपंच प्रकाश सपाटे, सल्लागार भारत नाना माने, दीपक माने, संस्थेचे चेअरमन गणेश सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

या शिबिरामध्ये शुगर, बीपी, हार्ट तपासणी त्याचसोबत इतर काही आजारांचीही मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये साधारण १२० नागरिकांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिरासाठी पंढरपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर अभिजीत नामदे व त्यांचे सहकारी कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच  बेगमपूर येथील लाईफ लाईन क्लिनिकचे डॉक्टर तोफिक मुलानी यांनीसुद्धा यामध्ये सहकार्य केले. त्यामुळे संस्थेचे चेअरमन गणेश सुर्यवंशी यांनी सर्व डॉक्टर व त्यांचा स्टाफ यांचे आभार मानले.