सिद्धेवाडी येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात बालकुमार ज्ञानअंकुर कोपराऱ्याचे मोठ्या थाटात उद्घाटन, उपक्रमाला वाचकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर(पंढरी नगरी न्यूज ) ; तालुक्यातील सिद्धेवाडी येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयामध्ये बालकुमार ज्ञान कोपराचे योजनेचे उद्घाटन पोस्ट मास्तर बाबुराव सावंतराव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा वाचनालयाचे सचिव तानाजी जाधव होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पाटील गुरुजी, उपाध्यक्ष डी डी .जाधव सर, आत्माराम शिंदे, सुभाष जाधव, विठ्ठल जाधव समाधान जाधव ,अशोक जाधव, मंदाकिनी सावंतराव इ.बाल वाचक उपस्थित होते. यावेळी बालकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या आदेशानुसार येथे बालकुमार ज्ञान कोपराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आणि वाचनाची आवड निर्माण होण्याची गरज असल्याचे सांगून बालकांनी नियमीत या ज्ञानकोपऱ्या उपक्रम योजने ब सून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले .यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमास लहान थोर वाचक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .आभार संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील गुरुजी यांनी व्यक्त केले.