*सिद्धेवाडी येथे कृषी विभागाचा"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमाचे आयोजन:- पंढरपूर तालुका कृषी विभागाचा पुढाकार*
______________________________________________________
*पंढरपूर,(प्रतिनिधी):-*
राज्य शासनाने कृषी विभागामार्फत नुकत्याच सुरू केलेल्या अभिनय योजनेची माहिती शेतकऱ्या पर्यंत पोहोचावी यासाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शेती संदर्भात येणाऱ्या विविध अडचणी वर मात करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तालुक्याचे कृषी अधिकारी भगवान सरडे यांनी सिद्धेवाडी येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत दिली .
या उपक्रमांतर्गत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील पदाधिकारी शेतकरी यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतातील एका संदर्भात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच येणाऱ्या अडचणी यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी सरडे म्हणाले की, विविध पिकावरील फळावरील तसेच शेतीबरोबर घेण्यात येणाऱ्या विविध शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन शेळीपालन व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर कृषी विभागाचे विकास मेढे यांनी प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग याबद्दल तर महेश देवकते नागेश पाटील सुनील प्रक्षाळे व महेश फाशी यांनी कृषी विभागाच्या वीर योजना ची माहिती सांगितली.
यावेळी कार्यक्रमासाठी विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, ग्रा सदस्य अप्पा जाधव, बाबुराव गोडसे रामचंद्र जाधव .औदुंबर जाधव. किरण जाधव .सोमनाथ जाधव .सत्यवान जाधव .योगेश जाधव .दीपक नवले .सागर जाधव .इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने चर्चासत्रात उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार विशाल नागटिळक यांनी मानले.