निरोगी शरीर ही काळाची गरज - उद्योजक संजय आवताडे

निरोगी शरीर ही काळाची गरज - उद्योजक संजय आवताडे

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्युज ) : मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत मारापूर नगरीचे  सरपंच तथा माणगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव  यादव यांच्या ४३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मारापूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान व सर्वरोग निदान शिबिराचा शुभारंभ आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.चे चेअरमन तथा नामवंत उद्योजक संजय आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उद्योजक संजय आवताडे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा विधायक संगम साधून विविध सामाजिक कार्यनैतिकतेचा मानदंड प्रस्थापित करणारे सरपंच यादव  यांचे नेतृत्व या भागातील जनतेसाठी विकासाचे वाटसरू म्हणून उदयास येईल अशा शुभेच्छा आवताडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
                      
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ.विवेक निकम यांनी आरोग्य व त्या संदर्भातील सर्व समस्यांचे सविस्तर विवेचन केले. व मारापुर ग्रामस्थांनी आयोजित केलेले आहे. या अनोख्या कार्यक्रमाचे कौतुक केले सदर वेळी डॉ. नितीन आसबे डॉ. धवलसिंह आवताडे,डॉ.विजय लवटे डॉ.मंजिरी आसबे,डॉ.सदानंद माने डॉ.रोहिणी निकम व मारापुरचे  सरपंच विनायक यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या रक्तदान शिबिरामध्ये ६१ लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
       
याप्रसंगी उद्योजक राजाभाऊ यादव, माजी संचालक भुजंगराव आसबे, विक्रम यादव, श्री.बबनराव आवताडे पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय भुसे,बालाजी यादव, भगवान आसबे, पिंटू मांडवे,नाथा माने, डॉ सत्यवान यादव ,संतोष गांडुळे इत्यादी मान्यवर, शरदचंद्र पवार कृषी माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अशोक आसबे यांनी तर आभार  दादासाहेब इंगोले (गुरुजी)यांनी केले.