पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल - रूक्मिणी मंदिरात सुरक्षतेच्या दृष्टीने कडक उपाययोजना, भाविकांना मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी , श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीचा निर्णय,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै,पंढरी नगरी न्यूज ) :- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणा-या प्रवेशद्वारावर सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरा सदृश्य प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व कर्मचा-यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
कर्मचा-यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हिआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे.
मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही यावेळी श्रोत्री यांनी सांगीतले.
___________________________________________________
श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या विठ्ठल भक्तांना दर्शन करतांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच पहलगामा हल्ल्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून 47 पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक केली असून जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी व पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला असून भाविकांनी तसेच मंदिर परिसरातील दुकानदार, नागरिकानी संशयरीत्या काही आढळल्यास तातडीने पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधण्यात यावा अशी माहिती.... शैलेंद्र हुंबे, पोलीस निरीक्षक मंदिर समिती पंढरपूर यांनी दिली.