भाळवणीत अज्ञात व्यक्तीने केले लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

भाळवणीत  अज्ञात व्यक्तीने केले लाखो रुपयाचे  शेतकऱ्यांचे नुकसान,   शेतकऱ्यांमध्ये  घबराटीचे वातावरण,  पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भाळवणी शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञात व्यक्तीकडून पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे , बोरची मोटर तोडून बोअर मध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केल्या जात आहेत. अशा विविध कारणामुळे सदर शेतकरी हवालदिल झाले असून रीतसर पोलीस तक्रार करूनही पोलीस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोपट एकतपुरे यांनी केळीच्या पिकांसाठी उसाचे बग्यास आणले होते. सदर बागेस रात्री पेटवून दिले .नंदकुमार कापसे यांच्या शेतातील मकवानाची गंज रात्री पेटवून दिली. जगन्नाथ शिंदे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला. प्रसंग सावधानामुळे पेटलेला ऊस विझवण्यास यश आले. प्रशांत माळवदे यांच्या बोर मधील मोटार, पाईप, केबल, दोरी कट करून मोटार बोर मध्ये सोडली आहे. त्याचप्रमाणे देविदास लिंगे यांच्या शेतातील चेंबर ,सेंचुरी फोडून इतरत्र नेऊन टाकण्यात आली. दिलीप वाघमारे यांच्या विहिरीवरील मोटार ,पाईपलाईन, बोरची पाईप लाईन तोडून टाकण्यात आली. मोहन वाघमारे यांच्या शेतातील मोटारीच्या पेटीला करंट देण्यात आला होता. तसेच ऊसही पेटवून दिला आहे. चंद्रकांत शिंदे यांच्या शेतातील मकवानाची गंज पेटवून दिली आहे.घराजवळ जादू टोना करून लिंबू,सुई, दाबन,खिळे,बाहुल्या टाकल्या जात आहेत.पोलिसांच्या कडे तक्रार केल्यानंतरही गेली एक-दोन दिवसात दिलीप वाघमारे व वैभव वाघमारे यांच्या शेतातील ठिबक, पाईपलाईन ,जळून खाक झाली. रनजीत मदने यांच्या शेतातील चेंबरचे, पाईपलाईन ची फोड करण्यात आली आहे.

तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊनही पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून केली जात आहे.