सिधेवाडी येथील जाधव-नागणेवस्ती शाळेत बालदिन उत्साहात साजरा.....
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातीलसिद्धेवाडी येथील केंद्रातील आपल्या जि.प. प्राथमिक शाळा जाधव-नागणेवस्ती शाळेत आज पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेला विशेष अशी रंगीत फुग्यांची सजावट केली होती. जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन धनाजी जाधव गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले.
बालदिनानिमित्त दप्तराविना शाळा घेण्यात आली. यावेळी दिवसभर शाळेत रांगोळी स्पर्धा, लिंबू-चमचा स्पर्धा, बादलीत चेंडू टाकणे आणि संगीत खुर्ची या स्पर्धा इयत्तानिहाय घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धात विद्यार्थ्यांनी सहभाग भरभरुन नोंदवला.
विजेत्या स्पर्धकांना उद्या शाळेत परिपाठावेळी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्यांच्या घोषणा होताच विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांना यानिमित्त जिलेबी वाटून हा बालआनंद सोहळा साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. एम. बी. जाधव यांनी पंडीत नेहरू यांच्या कार्याबद्दल थोडीशी कल्पना दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनाजी जाधव गुरूजी आणि तेजस्विनी कांबळे-घोडके मॅडम यांनी फार मोठे परिश्रम घेतले.