सोलापूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन शासकीय कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दैनिक ,पंढरी नगरी न्यूज ) जिजामाता बहुउद्देशिय महिला मंडळ त शेटफळ ता. पंढरपूर संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सोलापूर येथील कार्यालयात ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त महिलांसाठी विविध " कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेच्या सचिवा पूजा शत्रुघ्न कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . संस्थेच्या सोशल वर्कर शिल्पा गायगवळी मॅडम , ज्योती हत्याळीकर मॅडम यांनी महिला दिनाचे महत्व पटवून सांगितले .बालसंगोन योजनेच्या लाभार्थी बालकाच्या पालक प्रतिनिधी श्रीमती भट्टड मॅडम यांनी महिला दिनाच्या निमित्ताने खास कविता वाचन केले . या कार्यक्रमास बालसंगोपन योजनेच्या बहुसंख्य लाभार्थी महिलांनी आपली उपस्थिती दाखवली . भविष्यातही संस्था बालकांच्या व पालकांच्या करिता विविध उपक्रम राबविणार असलेचे तसेच प्रत्येक लाभार्थी बालकांना संगोपन योजनेचे १२ महिन्याचे अनुदान बालकाच्या खात्यात जमा होण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशिल असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले .
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अनिता राऊत मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांचे व पालकांचे आभार मानले जागतिक महिला दिन कार्यक्रमास महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .सदर कार्यक्रम संस्थेचे मानद प्रकल्प संचालक शत्रुघ्न कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.