आत्ता तलवार काढली नाही तर परत तलवार काढायला संधी मिळणार नाही - माजी मंत्री सतीश पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

आत्ता तलवार काढली नाही तर परत तलवार काढायला संधी मिळणार नाही - माजी मंत्री सतीश पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

------------------------------------------------------------------------------------

कामती( पंढरी नगरी न्यूज ) मराठा समाजातील तरुणांनी आता तलवार काढली नाही तर परत तलवार काढायला संधी मिळणार नसल्याचे मत काँग्रेसचे माजी मंत्री सतीश उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले ते महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील कामती येथील आयोजित भव्य जाहीर सभेत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्या लोकांना त्यांची जागा दाखवायचे काम येणाऱ्या सात तारखेला करायचे आहे. यावेळी सभेला महाविकास आघाडीतील पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मतदार, बंधू -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.