*पंढरपूर तालुक्यात होणार एमआयडीसी आमदार समाधान आवताडे यांनी दिली माहिती:-*

*पंढरपूर तालुक्यात होणार एमआयडीसी आमदार समाधान आवताडे यांनी दिली माहिती:-*

------------------------------------------------------------------------------- 
आज मुंबई येथे संबंधित मंत्री,लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसोबत बैठक : 
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार 
------------------------------------------------------------------------------- 

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित असणारा एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषद दिली. पंढरपूर येथे एमआयडीसी उभारणीसाठी होत असलेल्या बैठकीच्या निमित्ताने माहिती देण्यासाठी बुधवारी पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषद आमदार अवताडे बोलत होते.
एमआयडीसीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून रांजणी किंवा कासेगाव येथील जागेचा पर्याय शासनाकडे सुचवला असून याबाबत दिनांक 15 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या दरम्यान बैठक होणार असल्याची माहिती आमदार अवताडे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना म्हणाले की पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी व्हावी येथील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा येतील तरुणांनी पुणे मुंबई येथे जाण्यापेक्षा आपल्या भूमीतच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी होणे गरजेचे आहे. पंढरपूर येथे उद्योगधंदेवाडी अनुकूल वातावरण आहे.

पंढरपूरला सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले शहर आहे. भीमा नदी असल्यामुळे नदीत पाणी मुबलक प्रमाणात आहे. विजेचा प्रश्न भेडसावत नाही त्याचबरोबर रेल्वे वाहतूकही उपलब्ध असल्याने उद्योग वाढीस चालना मिळणार आहे. पंढरपूर येथे याकरिता जागेचा पर्याय शोधला आहे याबाबत मुंबई येथील बैठकीत उद्योग मंत्री यांच्यासह संबंधित अधिकारी यांच्यासोबत याबाबत चर्चा होणार आहे यानंतर मंत्री महोदय ज्या सूचना देतील त्यानुसार पुढील जागा जागेची पाहणी करणे व इतर कामे करून दुसरी ते तिसऱ्या कॅबिनेट मीटिंगमध्ये काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करून सध्या सरकार भाजपचे आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडून तरुणाईसाठी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास आमदार अवताडे यांनी व्यक्त केला.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून तीर्थक्षेत्राला चालना देण्यासाठी आपण कायम कटिबंध असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.