बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज): येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमता प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
त्यावेळी भागवत बोबडे , उत्तमराव देशमुखे, समाजसेवक मा. सुहास सुतार, संतोष पाटील, सोमनाथ गायकवाड, दशरथ मोरे, किशोर भगत आदी उपस्थित होते. या औचित्यानी प्रमुख मान्यवरांनी आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले.यावेळी सभासद,वाचक उपस्थित होते.