कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रेड रन स्पर्धाचे आयोजन

कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रेड रन स्पर्धाचे आयोजन

-----------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रीबन क्लब व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग (DAPCU), सोलापूर, शासकीय ग्रामीण रुग्णालय, बार्शी. यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी गुरुवार, दिनांक ११ जुलै, २०२४ रोजी ‘रेड रन स्पर्धा -२०२४’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय रुग्णालय, सोलापूरचे मा. डॉ. भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी, सोलापूर, हे उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी चे प्राचार्य डॉ. एस.एस गोरे हे उपस्थित होते. तसेच यावेळी कार्यक्रमासाठी शारीरिक शिक्षण विभागाचे विभागप्रमुख, महाविलयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते ‘रेड रीबन क्लब’ दर्शवणाऱ्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. एम. एस. डिसले कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.एस.गोरे यांनी जीवनात आरोग्याला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले. आजच्या आधुनिक धकाधकीच्या गतिमान जगामध्ये आपण वावरत आहोत. समाजातील नागरिकाकडून स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, याचे दुरगामी अनिष्ट परिणाम आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहेत. याचा विचार करून आपण दिवसातील स्वतःसाठी किमान एक तास काढला पाहिजे. लोक जागृती व्हावी, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.आपण सर्वांनी चालणे,पळणे, शक्य असेल ते हलकेफुलके व्यायाम करावेत असे आवाहन, केले . त्यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या . 

सदर रेड रन स्पर्धा- 2024 मध्ये महाविद्यालयातील एकूण 25 मुले व 25 मुली असे एकूण 50 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यातील 25 मुलांमधून अनुक्रमे “ श्री. नवनाथ कुंडलिक गडदे बी.पी.एड. भाग दोन या स्पर्धकाने प्रथम क्रमांक पटकावला, श्री. चंद्रशेखर प्रकाश म्हेत्रे बी.पी.एड. भाग दोन या स्पर्धकाने द्वितीय क्रमांक तर श्री.विशाल गुणवंत शिंदे व श्री. शुभम सुनील मारकड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच या स्पर्धेमध्ये एकूण 25 मुलींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कु. अवारे दिव्या सत्यवान बी.एड. भाग दोन -प्रथम क्रमांक, कु. दीक्षित प्रज्ञा आनंद बी.एड. भाग दोन- द्वितीय क्रमांक व कु. जंत्रे कोमल सुभाष बी.पी.एड. भाग दोन या स्पर्धकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धेमध्ये पंच म्हणून प्रा. पंकज नरळे यांनी काम पाहिले, तसेच चीफ लॅब स्कोअरर म्हणून बी.पी.एड. विभागातील प्रशिक्षणार्थींनी कार्य केले. या स्पर्धच्या शेवटी विजेत्या स्पर्धकाना अनुक्रमे प्रथम क्रमांक – रक्कम रुपये, 2000/-, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – रक्कम रुपये, 1500/-, सिल्व्हर मेडल व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांक – रक्कम रुपये, 1000/-, ब्रांझ मेडल व प्रमाणपत्र असे बक्षीस देऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेते मुले व प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेते मुली अशा एकूण सात विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. 

 या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन व कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.एस गोरे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र सोलापूर यांच्यावतीने मा. डॉक्टर भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी, सोलापूर, मा. डॉक्टर कृष्णा सकट, जिल्हा पर्यवेक्षक, सोलापूर. तसेच मा. श्री. हर्षल अहिरे, सोलापूर हे उपस्थित होते. 

रेड रन स्पर्धा - 2024 च्या यशस्वीतेसाठी मा. श्री. मच्छिंद्र लोंढे , समुपदेशक आयसीटीसी, ग्रामीण रुग्णालय ,बार्शी. व श्री पंडित कागणे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रामीण रुग्णालय, बार्शी. यांनी बहुमोल सहकार्य केले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून महाविद्यालयातील प्रा. डॉ. एम. एस. डिसले , कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी कार्य केले. रेड रन स्पर्धा – 2024 यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वंयसेवक व स्वंयसेविका यांनी परिश्रम घेतले.