राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी १५ डिसेंबर पर्यंत नामांकन भरण्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी १५ डिसेंबर पर्यंत नामांकन भरण्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर :( पंढरी नगरी न्यूज ) जलशक्ती मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा ते ग्रामपंचायतीपर्यंत विविध संस्थांना वैयक्तिक स्तरावरून नामांकन करण्यासाठी आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव यांनी केले आहे.
     
जलशक्ती मंत्रालय भारत सरकार च्या वतीने सन २०१८ पासून राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येत आहे.यावर्षीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सदरचे नामांकन प्रामुख्याने जलसंवर्धन व्यवस्थापन संबंधित नाविन्यपूर्ण काम करणारी उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट शाळा व उत्कृष्ट महाविद्यालय, संस्था, उत्कृष्ट समाज संस्था, उत्कृष्ट पाणी वापर संस्था व उत्कृष्ट पाणी या विषयावर काम करणारी व्यक्ती यांनी नामांकन करिता राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ( www.awards.gov.in ) १५ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाइन माहिती भरावयाची आहे.नामांकन भरण्यासाठी मागील एक वर्ष कालावधीत जलसंवर्धन व्यवस्थापन संबंधित काम केलेल्या संस्था व व्यक्ती या पात्र असणार आहेत. नामांकनासाठी माहिती भरलेल्या संस्था किंवा व्यक्तीने एक प्रत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयात सादर करावयाची आहे.
      
या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये जलसंवर्धन व व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, समाज संस्था किंवा उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती यांनी या स्पर्धेसाठी नामांकन भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण पाटील यांनी केले आहे.