*विठ्ठल कारखाना चालविण्यास अभिजीत पाटील यांना मदत करणार -- समाधान काळे*

*विठ्ठल कारखाना चालविण्यास अभिजीत पाटील यांना मदत करणार -- समाधान काळे*

पंढरपूर( प्रतिनिधी) गुरसाळे (तालुका पंढरपूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा विठ्ठल परिवारातील असल्याने त्यामध्ये कोणत्याही अडचणी न आणता येणाऱ्या गळीत हंगामात उसाचे जास्तीत जास्त गाळप  करण्यात येणार असल्यानेत्यास माझे सर्वतोपरी सहकार्य  व मदत करण्यात येणार असल्याचे मत कारखान्याचे संचालक  समाधान दादा काळे यांनी व्यक्त केले,  
आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी संचालक मंडळाची मीटिंग आयोजित करण्यात आली होती, 

या मिटिंग मध्ये अभिजीत पाटील यांनी  मागील दोन वर्षापासून सभासदांचे असणारे थकित असलेले ऊस बील तातडीने सभासदाच्या खातेवर जमा केल्याने त्यांनी  वचनपूर्ती  करून  सभासदांचा विश्वास पात्र केला आहे. त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे। त्याबद्दल प्रथमता तालुक्यातील सभासदांना थकित ऊस बिल दिल्याबद्दल कारखान्याचे संचालक समाधान काळे यांनी या मिटिंग मध्ये अभिजीत पाटील अभिनंदना चा ठराव मांडला . या ठरावास दिनकर चव्हाण यांनी अनुमोदन दिले. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांचा सर्व सभासदांच्या वतीने संचालक समाधान काळे यांनी शाल श्रीफळ फेटा बांधून जंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कारखान्याचे व्हॉइस चेअरमन सर्व संचालक मंडळ व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.