पंढरपूर चैत्री यात्रा: दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी- प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर चैत्री यात्रा: दिंडीधारकांनी  प्लॉटसची मागणी नोंदवावी- प्रांताधिकारी सचिन इथापे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 29 मार्च 2026 रोजी साजरा होत असून, यात्रा कालावधी 23 मार्च ते 02 एप्रिल 2026 असा आहे. या यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दि. 23 मार्च पासून प्लॉट नोंदणी सुरु करण्यात आली आहे. संबधितांनी भक्तीसागर येथे प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आले आहे.

चैत्री यात्रेला येणाऱ्या दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तीसागर (65 एकर) येथे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जातात.या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्‍कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते. 

भक्तीसागर (65 एकर) येथे भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येणार असून आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे (मो.क्र.9767248210), तसेच ग्राम महसूल अधिकारी प्रमोद खंडागळे (मो.क्र. 9657290403)) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.